vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

*सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

आरोग्य प्रतिनिधी- जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमिया या आनुवंशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग सज्ज झाला असून आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या विशेष अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ४० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांची प्राथमिक सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान संशयित रुग्ण व वाहकांची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार एचपीएलसी (HPLC) किंवा इलेक्ट्रोफोरेसिस या प्रगत तपासण्या केल्या जाणार आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा या अभियानासाठी सज्ज झाली आहे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अभियानादरम्यान ४० वर्षांपर्यंतच्या नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जाईल. संशयित रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना औषधोपचार, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे. भावी पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशनावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अभियान यशस्वी करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बॅनर, पोस्टर्स, सोशल मीडिया, गृहभेटी यांद्वारे सिकलसेल अॅनिमियाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागात महिला मंडळांच्या माध्यमातूनही विशेष जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत.

या अभियानासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाची एकूण २९७ पथके सिकलसेल सर्वेक्षणाचे काम करणार असून यामध्ये आरोग्य सेविका, एएनएम, आशा स्वयंसेविका व समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असणार आहेत.

सिकलसेल मुक्त रायगड जिल्हा करण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, विशेषतः तरुणांनी तपासणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान राबविणार

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

vishwatmaklokswamivarta

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta