vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

नवी दिल्ली, प्रतिनिधी : ‘श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.

नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.

नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती

 (श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.

यावेळी पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, राज्यस्तरीय समन्वय आयोजन समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते. )

 

संबंधित पोस्ट

परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ…परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ…

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन-स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण