vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर/ जालना, लातूर /बीड अंतर्ग येत असलेल्या सर्व शासकीय / अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता १० वी ते १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी या परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी नामवंत प्रशिक्षण संस्थांमध्ये मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन द्यावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी चेतना मोर्रे यांनी केले आहे.

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा तसेच EMRS / मराठी माध्य शाळा / जिल्हा परिषद/ नगरपालिका व महानगर पालिकांमधील माध्यमिक शाळां मध्ये इयत्ता १० वी नंतर ११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २ वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आय. टी. आय. मधील अभ्यासक्रमा च्या प्रवेशा करीता (JEE/NEET/CET) जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र राहतील. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर /जालना /लातूर/बीड अंतर्गत येत असलेल्या शासकीय अनुदानित आश्रमशाळा/EMRS / मराठी माध्य शाळा / जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावे. विहीत नमुन्यातील आवेदनपत्र शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कडे विनामुल्य उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची आवेदनपत्र लवकरात लवकर प्रकल्प कार्यालयाकडे / मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे

०००००

संबंधित पोस्ट

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबध्द : सीएस डॉ.भागवत भुसारी-जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आरोग्य शिबीर संपन्न…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta