vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण

नांदेड प्रतिनिधी:- पूरग्रस्त भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या विशेष पुढाकारातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या अंतर्गत दक्षा RPTO, उद्यमिता लर्निंग सेंटर येथे पूरग्रस्त भागातील २० तरुणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आले.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर प्रभावित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला. या प्रशिक्षणामध्ये हसनाळ, रावणगाव, भिंगोली आणि भाटापूर या गावांतील एकूण २० तरुणांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना डीजीसीए कडून १० वर्षांसाठी ड्रोन ऑपरेटर परवाना प्रदान करण्यात आला आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना ड्रोन पायलट म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी त्यांना दक्ष RPTO कडून मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे शेती फवारणीसारखा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा विशेष उपक्रम आहे.

00000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या

vishwatmaklokswamivarta

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार ..