vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

लातूर, प्रतिनिधी : लातूर, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुल, दुसरा मजला उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, लातूर येथे व्यक्तीश: किंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com व ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.
राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. लातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेड, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.
****

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात १०६७ रुग्णांना सुमारे ०८.२१ कोटींची मदत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती 

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; नियंत्रित क्षेत्रे घोषित, मनाई आदेश लागू

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

ओटी भरण कार्यक्रमानिमित्त वाई तालुक्यातील 925 गरोदर मातांची आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta