vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्य प्रतिनिधी-कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आय.एम.आय.एस (इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) प्रणाली मध्ये पूर्ण माहिती भरावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

शिरोळ विधानसभा मतदारसंघातील १५ नळ पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे हस्तांतरित झाल्या नाहीत. त्यापैकी एका गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महावितरणचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी जल जीवन मिशन कार्यक्रमातील शिरोळ तालुक्यातील हरोली, नांदणी आणि यड्राव नळपाणी पुरवठा योजनेचा आढावा घेऊन मंत्री पाटील यांनी नवे दानवाड नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवावा, तसेच लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, असेही निर्देश दिले.

बैठकीस शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव श्रीरंगा नायक, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या वैशाली आवटे, कोल्हापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपअभियंता एस.एस.लोहार उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

संबंधित पोस्ट

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

६ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने …..आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन 

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे पेटसिटी युनिटचे लोकार्पण

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..

एमएडीसीने इतिहास रचला! अमरावतीविमानतळावर प्रथमच एटीआर-७२ चाचणीविमान यशस्वीरीत्या लँड झाले,प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात!