vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि

प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदी या दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा करणे, सूचना देणे आणि केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल मार्फत मंगळवार, दि.23 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वा. कॉन्फरन्स हॉल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल व्हॅली शिल्प को.ऑप. हौ.सो. बिल्डींग नं. एच-1, दुसरा मजला, सेक्टर 36 खारघर नोड, ता.पनवेल येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला पनवेल, उरण, खालापूर व कर्जत या तालुक्यातील सर्व वाहतूकदार, कुरियर प्रतिनिधी आणि बुकींग एजन्सी धारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहा.प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल सुरज पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या व मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे: बुकिंग पोर्टल्सवर नाव बदल करणेः महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे “छत्रपती संभाजी नगर”, उस्मानाबाद शहराचे “धाराशिव” व अहमदनगर शहराचे “अहिल्यानगर” असे नावात बदल केले आहेत. सर्व प्रवासी वाहतूकदार व बुकींग एजन्सी यांनी त्यांच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये ही नवीन नावे तातडीने अ‌द्ययावत करणे बंधनकारक आहे.

 

 प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदी- मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल सु-मोटो जनहित याचिका क्र. 08/2020 मधील आदेशानुसार, नायलॉन सिंथेटिक मांजाच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक वाहतूकदार व कुरियर एजन्सीज यांनी नायलॉन मांजाची वाहतूक (Transport) करू नये याबाबत आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा

भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी व्हा…

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख