vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे शनिवारी सांगलीत आगमन

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे शनिवारी सांगलीत आगमन

        सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “राज्यमाता गोमाता संवाद यात्रा” दिनांक २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार आहे. दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता हि.हा. विजयसिंहराजे पटवर्धन सभागृह, श्री गणपती मंदिर, गणपती पेठ, सांगली येथे राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आगमन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील गोशाळा संचालक, गोपालक,गोरक्षक, शेतकरी, महिला बचत बचत गट, युवक स्वयंसेवक तसेच सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.

यानिमित्त सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचा विभागीय गोसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हि. हा. विजयसिंहराजे पटवर्धन व युवराज आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन हेही उपस्थित राहणार आहेत.

या यात्रेचा शुभारंभ २२ जून रोजी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे झाला. ही संवाद यात्रा सलग १५ दिवस सूरू राहणार असून या यात्रेदरम्यान सुमारे 6000 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे संचालन होणार आहे. यामध्ये राज्यातील 1 हजार हून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवाासात 15000 पेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक, आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्देश,रासायनिक शेतीला पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे. राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन करणे. गोबर (शेण) आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी (जसे की सेंद्रीय खत, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तू) जनजागृती करणे. पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन व संसाधने विषयक योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे. गोशाळा संचालकांच्या आढावा बैठक घेणे, तसेच पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय राहील यासाठी प्रयत्न करणे. कायदा वसुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे याबाबत मार्गदर्शन. संपूर्ण हत्याबंदी कायद्याचा प्रसार करुन कायदेशिर बाबींविषयी समाजाला अवगत करणे. स्थानिक देशी गोवंशाच्या पालनपोषन संदर्भात वैज्ञानिक व पारंपारिक पध्दतीची माहिती देऊन जनजागृती करणे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल· नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम गडचिरोलीत लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…