vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, प्रतिनिधी: कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी माध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबाडी पाणीपुरवठा योजनेऐवजी शिवना टाकळी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजना जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कन्नड शहराच्या नागरिकांसाठी वाढत्या गरजेनुसार योग्य व शाश्वत पाणीस्रोतांचा विचार करून, दोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

OOOO

संबंधित पोस्ट

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘एचएएल’च्या तंत्रज्ञांचे राज्यपालांकडून कौतुक

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन