vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग..

मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद, सर जे. जे. महानगर रक्त केंद्र व हरिवंश राय बच्चन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात राज्य माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार रामभाऊ गुंडीले, फिरोज मासुकदार, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी, तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक निवृत्ती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी सर जे. जे. महानगर रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा आचार्य, सर जे जे रुग्णालय व महाविद्यालयाच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीता डांगे, तसेच प्रतिष्ठानचे हरीश रावल आदींनी सहभाग घेतला.

सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरास सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी, शासकीय व पोलीस अधिकारी, कर्मचारी, व नागरिकांनी भेट दिली. यावेळी रक्तदानाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· साधू, महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन· आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा

महाराष्ट्र दिनाची पूर्व तयारी आढावा बैठक…

मुंबईत आता नोंदणी न केलेला भाडेकरार आता बेकायदेशीर-ऑनलाइन नोंदणी आवश्यक….

vishwatmaklokswamivarta