vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महिला बचत गटातील सदस्यांनी घेतले संविधानाचे धडे…

महिला बचत गटातील सदस्यांनी घेतले संविधानाचे धडे…

        नवी मुंबई प्रतिनिधी – भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा होत असून अमृत महोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “घर घर संविधान” अभियान राबविण्यात येत आहे.

  या अनुषंगाने नवी मुंबई संविधान साक्षर होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून प्रथम टप्प्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथमत: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली व न.मुं.म.पा मुख्यालय येथे संविधान साक्षर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 22 मे 2025 रोजी कै.अण्णासाहेब पाटील स्मृती भवन, कोपरखैरणे येथे परिमंडळ 2 विभाग व कोपरखैरणे विभाग येथील अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 त्याचप्रमाणे 29 मे 2025 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे समाजविकास विभागातील सर्व समाजसेवक व समुहसंघटक आणि घणसोली, ऐरोली, दिघा विभाग कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.     यापुढील टप्प्यात दि.30 जुलै 2025 रोजी न.मुं.म.पा. क्षेत्रामधील महिला बचत गटांत सक्रीय असलेल्या महिला कार्यकर्त्यांकरिता संविधान साक्षर कार्यशाळेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील 97 महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या. भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक श्री.सुरेश सांवत यांनी या महिलांना संविधानाचे मूल्य व अधिकार या विषयावर सोप्या भाषेत माहिती देत संविधानाचे महत्व विषद केले. यापुढील काळात विभागनिहाय महिला बचत गटांकरीता संविधान साक्षर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta