vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!

जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!

राज्य प्रतिनिधी

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या ‘नवोन्मेषी जीएसटी सुधारणा’ आता प्रत्यक्षात अमलात आल्या असून, जीएसटी परिषदेने केंद्र सरकारच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली आहे.

आता 12% व 28% ऐवजी फक्त 5% आणि 18% कर लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.

या सुधारणांमुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवक, छोटे व्यापारी तसेच मध्यमवर्ग यांना दिलासा मिळणार आहे. आरोग्यविषयक सेवा अधिक परवडणाऱ्या होतील आणि देशभरातील उद्योगसुलभतेस नवे बळ मिळेल.

हा निर्णय नागरिकांच्या सबलीकरणासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार!@narendramodi @nsitharaman @Dev_Fadnavis#NextGenGST #GSTReforms

संबंधित पोस्ट

पुनर्रचित हवामान आधारित पेरू, लिंबू, चिकू व मोसंबी या फळपीकासाठी विमा योजनेत मुदतवाढ

अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध;11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी

सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामस्थळी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करणेविषयी नोटीस..

vishwatmaklokswamivarta

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर