vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.

 

        सांगली, प्रतिनिधी) : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.

    अनुदान योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना 50 हजार रूपये पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रूपये हे अनुदान म्हणून व 25 हजार रूपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थीला दिले जाते.

   बीज भांडवल योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना रू. 500001 ते 5 लाखापर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीज भांडवल 20 टक्के व अनुदानाचा रू. 50000/- चा समावेश आहे.

       थेट कर्ज योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्‍ट 3 आहे. ही योजना एक लाख रूपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम 75 हजार रूपये व अनुदान रक्कम 20 हजार रूपये पर्यंत दिले जाते. लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे   अर्जदारांनी www. Hindu Khatik Samaj Economic Developemnt Corporation Ltd.gov.in या बेवसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन पदध्तीने भरून महामंडळाकडील सर्व योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मा. जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड संभाजीनगर सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2325659 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन