vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ..

 

पुणे, प्रतिनिधी : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पुणे येथील जेडब्लू मेरियट हॉटेल मध्ये आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.

पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान