vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

पुणे प्रतिनिधी-पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी महत्त्वपूर्ण असून प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी पुढील ५ वर्षांत खर्च करण्यासाठी ५,००० कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून सुरु करावयाच्या प्रकल्पांचा प्राथम्यक्रम ठरवून प्रकल्प आराखडा तयार करावा,अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मॅकेन्झी कंपनीचे रौनक शहा तसेच पीआयसीचे संचालक दिनानाथ खोलकर उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले यांनी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमान, गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख बाबी लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा सादर करावा, प्रकल्पांची यादी तयार करताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा अशा सूचना दिल्या.

श्री. हर्डीकर म्हणाले, प्रत्येक प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च व कालक्रम ठरवावा, अनेक प्रकल्पांना भूसंपादन आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत महानगर प्रदेशांच्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करुन उद्योग, रोजगार व गुंतवणूक वाढीस चालना आदी बाबींचा विचार करुन बृहत आराखडा तयार करावा.

पुणे महानगर प्रदेश माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था यांमुळे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या उपक्रमांतर्गत महानगर क्षेत्राच्या विविध विकासासह सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे व रोजगाराकरिता मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे ध्येय असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत नीती आयोगाला सादर करावयाच्या मसुद्याचे मॅकेन्झी कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले.

संबंधित पोस्ट

सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta