
गणेशोत्सवात रक्तदानाचा सामाजिक संदेश द्या! डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रक्त व प्लेटलेटची गरज वाढली,गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरे घ्यावीत : गणेश चौधरी
जालना (प्रतिनिधी) : गणेशोत्सव केवळ उत्सव म्हणून न साजरा करता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा गणेश चौधरी रक्तदाता समूह, जालना यांचे संस्थापक अध्यक्ष गणेश चौधरी यांनी केले आहे. सध्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने अनेक रुग्णांना रक्तातील प्लेटलेटची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत वेळेवर रक्त व प्लेटलेट उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा दीर्घकाळ साठा करून ठेवता येत नसल्याने नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.



