vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड स्टार आमिर खान यांनी अभिनेता साउथ चा सुपरस्टार अल्लू अर्जुन  पुष्पा 2 या चित्रपटाचे अभूतपूर्व कलेक्शन वर केले अभिनंदन…

बॉलीवूड स्टार आमिर खान यांनी अभिनेता साउथ चा सुपरस्टार अल्लू अर्जुन  पुष्पा 2 या चित्रपटाचे अभूतपूर्व कलेक्शन वर केले अभिनंदन…

 

बॉलीवूड प्रतिनिधी- जगभरात साउथ चा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा तू या चित्रपटाने अबूतपूर्व कमाई केल्याने तसेच लवकरच आमिर खान याच्या दंगल चित्रपटाने जेवढी कमाई केली त्याच्या पेक्षा आकडा हळूहळू वाढत असल्याने दंगल चित्रपटाच्या कलेक्शन वर जाण्याची शक्यता चित्रपट सूत्रांकडून मिळत आहे यावर बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांनीही अल्लू अर्जुन आणि त्यांच्या टीमला अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

बॉलीवूड अभिनेता साउथ चा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करत आहे. पुष्पा 2 च्या वादळात अनेक चित्रपट वाहून गेले आहेत. या चित्रपटाने 25 दिवसांत इतके उत्तम कलेक्शन केले आहे की तो आता सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट बनणार आहे. पुष्पा 2 ने सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे आणि नंबर 2 वर आला आहे. या यादीत आमिर खानचा दंगल पहिल्या क्रमांकावर आहे. दंगलचा विक्रम मोडण्याच्या जवळ आलेल्या पुष्पा 2 चे आमिर खानने अभिनंदन केले आहे.

आमिर खानचा दंगल हा चित्रपट सर्वाधिक कमाई करून पहिल्या क्रमांकावर आहे. दंगलच्या लाइफटाईम कलेक्शनबद्दल बोलायचे तर ते 2070.3 कोटी इतके आहे. पुष्पा 2 आता अगदी जवळ आली आहे. चित्रपट ज्या पद्धतीने कलेक्शन करत आहे ते पाहता आता दंगलचा रेकॉर्ड फार दूर नाही असे म्हणता येईल.

पुष्पा 2 ने जगभरात 1760 कोटी रुपये जमा केले आहेत. आता ‘दंगल’चा रेकॉर्ड तोडण्यासाठी आणखी 310 कोटींची कमाई करावी लागणार आहे. पुष्पा 2 ज्या प्रकारे करत आहे, दंगलचा विक्रम मोडायला जास्त वेळ लागणार नाही. असेही चित्रपटाचे अनेक समीक्षक बोलत आहेत

 

संबंधित पोस्ट

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवली

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात…

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..

बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ‘बूंग’ चित्रपटाच्या टीमचे केले अभिनंदन मणिपूर आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण – पंतप्रधान