vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर…

धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर…

राज्य प्रतिनिधी-

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे अद्याप शासनाचे निर्देश नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

धुळे जिल्हृ्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील महिला भिकुबाई प्रकाश खैरणार यांनी ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स्वत:हून अर्ज करुन जिल्हा प्रशासनास कळविले आहे की, माझ्या अर्जास माझ्या मुलाचे आधारकार्ड जोडले गेल्याने लाभाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे सदरची रक्कम मी स्वत:हून परत करीत आहे. त्यानुसार या महिलेने स्वत:हून परत केलेली रक्कम प्रशासनाने जमा करुन घेतली असल्याचे श्री. पापळकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या योजनेबाबत कुणाचा अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta

आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील १५ ऑगस्टपूर्वी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी 

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन