vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

 

 सांगली, द प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे बंद लिफाफ्यात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

 जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटु (महिला व पुरुष), दिव्यांग खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. या पुरस्कारांतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी सांगली जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील मान्यताप्राप्त स्पर्धेत सहभागी होऊन अत्युच्च कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कृपामाई हॉस्पिटल समोर, सांगली मिरज रोड, सांगली येथून प्राप्त करुन घ्यावेत.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बोरवडेकर यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

आज,17 एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड..

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासकीय योजनांचा उद्देश सफल व्हावा – खासदार नामदेव किरसान-दिशा समितीच्या आढावा