vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

” धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

मुंबई प्रतिनिधी

सन १९७५ मध्ये धारावीतील संत कक्कय्या मार्गावरील म्युनिसिपल चाळ नं.९आणि १० च्या परिसरात ५ मित्रांनी पुढाकार घेऊन एक वटवृक्षाच्या मातीच्या कट्ट्यावर श्रद्धा व हौशेपोटी स्थापित केलेल्या “पंचशिल गणेश” नावाने सुरू केलेल्या मंदिराचे रुपातर सन १९९० नंतर पंचशिल गणेश मित्र मंडळ (रजि) आज सन २०२५ मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षा कडे माठेया उत्सहाने वाटचाल करीत आहे. त्यावेळीचं मुळरोवणारे श्री महादेव नरहरी नारायणे, श्री महादेव कृष्णा शिंदे यांच्यासह शंकर त्रिंबके (करगणीकर) कै. सुदाम सोनवणे (नरवणे), कै. दत्तु शिंदे (दहीवडीकर) यांच्या प्रयत्नातून “पंचशित गणेश” ने आकार घेतला. त्यानंतर दर महिना संकष्ठी, आरती, पुजा-प्रसाद सुरू राहिला. त्यावेळे पासुन शिंदे परिवार या मंदिराची स्वच्छता, जोपासना करित आहे.

  सन १९८९च्या काळात संयुक्त क्रीडा मंडळात सार्वजनिक गणेशोत्सव (नवीचाळ,कोकणीचाळ) साजरा होत होता. पण काळानुसार पहिल्या पिढीने १९९० दरम्यान पंचशिल गणेश मंदिराचा कारभार दुसऱ्या पिढीकडे कै बाळकृष्ण पवार, के. तानाजी नारायणे, कै.शांताराम गाडेकर, कै. देवजी शिंदे,कै.अरुण हसनाळे,मंगेश सोनवणे, सुर्यकांत खरटमल,अरुण नारायणे यांच्याकडे सोपविला, त्यानीं नंतर तिसऱ्या पिढीकडे मंदिर व मंडळाचा कारभार सोपवत त्या पंचशिल मंदिरात सार्वजनिक गणेश उत्सव सुरु करण्यात आला.या अवधित श्री महादेव नारायणे, श्री.महादेव शिंदे यांनी सल्लागार भुमिकेत राहुन तिसऱ्या पिढीला प्रोत्साहित केले.

 पंचशिल गणेश चे रूपांतर पंचशिल गणेश मित्र मंडळ (रजि)मध्ये झाले पिढी बदलली,काळ बदलला तिसऱ्या पिढीतील शिक्षित मुलांनी पुढाकार घेऊन मंदिर सेवेसोबतच समाजकार्याची जोड देत, आजुबाजुच्या परिसरातील लोकोनाही जोडुन घेत पसारा वाढविला. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात भर पडत गेली. मंडाळा कार्यालय नव्हते.सन २०००ते २००१ या कालावधीत प्रि. मनोहर जोशी सर खासदार असताना (म्हाडामार्फत) मंडळाची वास्तू उभारली.

मंडळाची वास्तु उभारल्यामुळे कार्यकर्ते एकत्र येणे, मंदिर व्यवस्था, सार्वजनिक कार्यक्रम, दरमहा संकष्टी, माघी गणेशोत्सव,किडा-खेळाला प्रात्साहन मिळाले.

यंदाचे पंचशिल गणेश मित्र मंडळाचे ५०वे वर्ष असल्यामुळे मंडळाने दि.२६जानेवारी,ध्वजारोहण, रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी(रक्तदात्यांना श्री. गणेशाची चांदीची फोटो फ्रेम भेट दिल्या) दि. १फेब्रु रोजी श्री गणेश पुजन, अभिषेक, होमहवन, सांयकाळी महाआरती व महाप्रसाद, दि.२फेब्रु रोजी दिवसभर खेळ महोत्सव,रोख रक्कम व आकर्षक बक्षीस, दि.३फेब्रु.दुपारी टाटा हॉस्पीटल (परेल) रुग्णांना फळे वाटप व अन्नदान,सायंकाळी महिलांसाठी खेळ महोत्सव,दि.४ फेब्रु- महिलांच्या भेटीगाठी,हळदी कुंकू समारंभ, होम मिनिस्टर कार्यक्रम, दि५ फेब्रु. सांयकाळी सांस्कृतीक कार्यक्रम लावणी, सत्कार समारंभ,पारोतोषिक वितरण समारंभसह,दिव्यांसाठी वॉकर, जेष्ठांना काठी,व्हील चेअर,स्थानिक मंडळाला स्ट्रेचर वाटप तसेच दि ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आदिवासी व दुर्गम भागातील २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नदान किट्स वाटप करण्यात येणार आहे.पंचशिल गणेश मित्र मंडळातर्फे वर्षभर सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक,उपक्रम राबविले जतात.

यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विकी हसनाळे, अविरत शिंदे,राजन पांडे , संदिप नारायणे , अश्विन हसनाळे, सागर मेढेकर,अरुण नाडार,गौरव कवडे, हरेश चव्हाण,स्वप्नील गाडेकर, किरण शिंदे,सोमनाथ सोनवणे इत्यादी कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात.पंचशिल गणेश मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत आर्थिक भार व मदतीसाठी विभागातील देणगीदार, हितचिंतकांसह, विविध संस्था,संघटना, डेकोरेटर यांच्या कडून मोलाची सहकार्य मिळत असते.त्यामुळे कोणत्याही अडचणी येत नाही.अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक श्री दिलीप म· गाडेकर धारावी यांनी दिलेली आहे

 

संबंधित पोस्ट

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भीमशक्ती रिपब्लिकन सेना महायुती घटक पक्षांचे मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..