vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे कायदेविषयक जनजागृतीपर शिबिर संपन्न

चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे कायदेविषयक जनजागृतीपर शिबिर संपन्न

        सांगली, प्रतिनिधी.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनीमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा 2012 (POCSO ACT) व रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती संबंधित कायदेशीर साक्षरता या कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

  या कार्यक्रमप्रसंगी सचिव गि. ग. कांबळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची काय कामे असतात, ती संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये कशा प्रकारचे काम करते याची माहिती दिली. तसेच त्यांनी मोटार वाहन कायदा, मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात व त्याचा वापर कसा व कोणी करावा याची उपस्थित विद्यार्थिनींना उदाहरणासहित माहिती दिली.

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. अमोल डोंबे यांनी लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा 2012 (POCSO ACT) याबद्दल उपस्थित विद्यार्थिनींना कायद्याबद्दल माहिती दिली व समाजाने याबद्दल जागरूक व्हावे, असे आवाहन केले. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT) याबद्दल मुलींना समजेल अशा भाषेमध्ये कायद्याचे वर्णन केले. मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे यायला हवे, न घाबरता आजच्या मुलींनी समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे. मुलींसाठी भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे निर्माण केले आहेत याबद्दल माहिती दिली. तसेच, ज्या देशाचे कायदे मजबूत त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या तेथील जनताही करीत असते, त्या देशाची प्रगती झाल्याचे सिंगापूरचे उदाहरण त्यांनी दिले.

पोलीस उपनिरीक्षक शेखर निकम यांनी उपस्थितांना वाहतुकीचे नियम, वाहतुकीचे चिन्हे या विषयवार मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा महत्वाची बाब आहे, त्यामुळे रस्ता सुरक्षेचे व वाहतुकीचे सर्व नियम नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. वाहन चालविण्याचा परवाना असल्याशिवाय कोणतेही वाहन चालवू नये, रस्त्यावर गाडी चालविताना किंवा रस्त्यावर चालताना कधीही मोबाईल फोनचा वापर करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वाहतुकीच्या नियम व रस्ता संरक्षण या संदर्भातील कायद्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक शाखेचे प्रविण माळी यांनी सहा ट्राफिक अॅपची माहिती व त्याचे फायदे याबाबत माहिती दिली व सर्वांना ती आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याच्या सूचना दिल्या.प्रास्ताविक शोभा पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जस्मीन मुजावर व आभार डॉ. सुजाता कराडे यांनी मानले.  कार्यक्रमास विजय कोगनोळे, विधी सेवेचे नितीन आंबेकर, वैभव सूर्यवंशी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.00000

संबंधित पोस्ट

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत 714 घरकुलांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून मंजूरी

vishwatmaklokswamivarta