vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

मुंबई, प्रतिनिधी- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले असून, यु. पी. एस. सी. परीक्षेतील महाराष्ट्रातील उमेदवारांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा हा यामागील उद्देश असल्याचे, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थाच्या, संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

या अभिरूप मुलाखतीसाठी पॅनल सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त पोलिस महानिदेशक विश्वास नांगरे पाटील, लोहमार्ग पोलीस आयुक्त, मुंबई डॉ. रवीद्र शिसवे, मुख्य आयकर आयुक्त, जयंत जव्हेरी, झोनल विकास आयुक्त, सेझ महाराष्ट्र गोवा दीव दमण, दादरा नगर हवेली ज्ञानेश्वर पाटील, संचालक, अणुविभाग नितीन जावळे, अक्षय पाटील (आयकर विभाग), माजी आय.आर.एस. व आय.पी.एस. अधिकारी विकास अहलावत, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा तसेच ए.आर.ओ.सी मध्ये कार्यरत रुजूता बनकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ प्रा. भूषण देशमुख आदि उपस्थित होते.

या मुलाखतीचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून या यूपीएससी अभिरूप मुलाखतीचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असल्याचे संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले.000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा 

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta