vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालयास चालू आर्थिक वर्षाकरीता थेट कर्ज योजनेचे उद्ष्टि प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडून मागविण्यात येत आहे.

थेट कर्ज योजनेचे भौतिक उद्दिष्ट ५० असून प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे.

निकषः- जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय १८वर्षे पूर्ण असावे व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये पेक्षा जास्त नसावी. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत समाविष्ट लघु व्यवसाय उदा. शेळी पालन, फळ भाजी विक्री, हॉटेल व्यवसाय, फिरते साडी सेंटर, झाडू टोपले, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, फिरते कापड व्यवसाय, बेकरी, द्रोण पत्रावाळी इ. व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रेः-

१. जातीचा दाखला, २. उत्पन्नाचा दाखला, ३. रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, ४. आधार कार्डची झेरॉक्स प्रत,५. पॅन कार्डची झेरॉक्स प्रत,६. दोन पासपोर्ट साईज फोटो, ७. व्यवसयाचे दरपत्रक (कोटेशन),८. व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणी भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं.आठ. लाईट बिल व टॅक्स पावती), ९. व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, १०.शैक्षणिक दाखला, ११. यापूर्वी शासकीय योजनेअंतर्गत किंवा महामंडळाकडून अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र.

प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.

कर्ज मागणी अर्ज महामंडळाच्या कार्यालयात दि.१७ फेब्रुवारी ते दि.५ मार्च पर्यंत विनामुल्य उपलब्ध आहेत.दि.२४ फेब्रुवारी ते दि.७ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायं.५ यावेळात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, खोकडपुरा शिवाजी हायस्कुलच्या बाजूला या ठिकाणी परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील.

टिप :१. थेट कर्ज योजने अंतर्गत कार्यालयाकडे यापूर्वी दाखल केलेले सर्व जूने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात यावे.

२. उद्दिष्टापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णयानुसार महामंडळे दि.14 मे 2012 नुसार लाभार्थ्यांचे निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहेत.

३. थेट कर्ज योजने अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्याचे कर्ज प्रकरण जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजूरीसाठी शिफारस करण्यात येईल.असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी…

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत…