vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शुक्रवारी (दि.१४) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

शुक्रवारी (दि.१४) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसर, एम.आय.डी.सी. वाळूज येथे शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी साडेनऊ वा. आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहुन मुलाखती घेणार आहेत, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये वोखार्ड रिसर्च सेंटर, रत्नप्रभा मोटर्स, फोर्ब्स प्रेसीशन टूल्स ॲड मशिन पार्ट्स., लिभेर अप्लायंन्सेस प्रा.लि., अलंकार ग्रूप, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि., वोखार्ड लि., पॅरासन मशीनरी इं. प्रा.लि., नवभारत फर्टीलायझर्स लि, एक्सेल प्लेसमेंट, पगारीया ऑटो, देवगीरी नागरी सहकारी बँक लि., अजंता फार्मा लि., सवेरा फार्मा, मायलन लॅबोरेटरी लि. इ. नियोक्ते उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

 कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारणपणे ५८८ पदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

  या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांनी दि.१४ रोजी सकाळी साडेनऊ वा. उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

चांदी: सोन्याचे भाव स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

अमृतची हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल; राज्यभरात ‘अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन’ उपक्रमयुवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी

केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती;अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम