vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. यानिमित्त शहरात  सकाळी साडेसात वा. या पदयात्रेचा आरंभ, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करुन या पदयात्रेस सुरुवात झाली.त्यानंतर पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ होईल.

 या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे,राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधानसभा सदस्य प्रदीप जयस्वाल, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्थित होते

 या पदयात्रेत क्रीडा ज्योत विद्यार्थी नेली. ही ज्योत यात्रेच्या समारोपानंतर विभागीय क्रीडा संकुलात नेण्यात येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिवकालिन वेशभुषेत व शिवचरित्रातील व्यक्तिरेखांच्या वेशभुषांमध्ये किंवा शालेय गणवेशात सहभागी होतील. क्रांती चौक येथे तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत इ. सादरीकरण होणार आहे. या पदयात्रेत नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच शहरातील शाळा महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सहभागाचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta