vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबई, प्रतिनिधी : नागपूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय (गोरेवाडा) येथील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.   सदस्य मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते.

  गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात विषाणुजन्य आजारामुळे प्राण्याचा मृत्यू होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले की, बाधित प्राण्यांचे पिंजरे निर्जंतुक करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार मृत प्राण्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोंबडीच्या मांसाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत माहिती घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी दिली.

संबंधित पोस्ट

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” उत्साहात संपन्न

जालना येथील श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना आवाहन*सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta