vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

 जालना,(प्रतिनिधी)-मराठवाडा ही संताची भूमी आहे. या भूमीच्या संतानी नेहमी समतेचा आणि शांतीचा संदेश दिला आहे. खर्‍या अर्थानं तो जपण्याची वेळ येवून ठेपली आहे असे प्रतिपादन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ह.दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) यांच्या 353 व्या उरुस निमित्त शनिवारी रोजी आयोजित कार्यक्रमात केले.
ह. दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) खुदाम व्यवस्थापन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही (353) वा उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. खोतकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, जेष्ठनेते इकबालपाशा शहर जिल्हा काँँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राज्य हज कमिटीचे फेरोजलाला तांबोळी, शिवसेना (उबाठा) चे शहर प्रमुख बाला परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, शिवसेना (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख विष्णु पाचफुले, माजी गटनेते गणेश राऊत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मिर्जा अनवर, वसंत जाधव, अ‍ॅड महेश धन्नावत आदि मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून व्यवस्थापन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.पुढे बोलताना श्री खोतकर म्हणाले की, ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा गौरवशाली इतिहास असून त्यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी आणि माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी व्यतीत करून समतेची शिकवण समाजात रुजविली आज याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक एकवटलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे जिलाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण बोलतांना म्हणाले की, ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा उरुस म्हणजे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असून या ठिकाणी सर्वजाती धर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने येतात.
  या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचा इतिहास देखिल आहे. या उरुस निमित्ताने आपसातील बंधुभाव व भाईचारा वृद्धीगंत होईल असा विश्‍वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केला सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रस्ताविक खुदाम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख फईम फलाही यांनी केले. यावेळी शेख शकील, मुखतार खान, लियाकत खान अजीम बागवान, परवेज आलम, खालेद मोमीन, गणेश चांदोडे, समाधान खाडे, शेख मुजीब, महंमद मुजामील, शेस सोहेल, शेख नावीद, फेरोज बागवान, फैजान शेख, गणेश लाहोटी, जावेद अली, शेख इनायत, सय्यद इरफान, जब्बार खान, इम्रान नाना, सय्यद शाकेद, महंमद मुद्दसर, शेख कबीर, शेख मजीद, बाबासाहेब सोनवणे, इम्रान बिल्डर, सय्यद मोबीन आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन परवेज आलम यांनी केले.

संबंधित पोस्ट

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व युवकांसाठी नव्या योजना मंजूर

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्तेउदघाटन..भाजपा मुळे माझी महाराष्ट्राभर ओळख – भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा जगातील नंबर वन पक्ष – रावसाहेब पाटील दानवे