vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…

जालना प्रतिनिधी-जालना जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकाने दिनांक 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी जालना यांना सामूहिक आत्मदाण्याचे निवेदन सादर केले असून हे शिक्षक दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंबड चौफुली पासून मोर्चा घेऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकांच्या सह्या असून त्या निवेदनात असे म्हटले आहे की, तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंजुरीने दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णय निर्गमित केला होता या शासन निर्णयात सुमारे 52 हजार 500 शिक्षकांना 20 टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा त्या शिक्षकांच्या हेडन्याय अनिवार्य खर्चातून त्यांचा पगार करावा असे म्हटले होते परंतु या शासन निर्णयास देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने डिसेंबर 2024 च्या पुरवणी अर्थसंकल्पात त्याला कुठलीही तरतूद न केल्याने व मार्च 2025 26 च्या अर्थसंकल्पात सुद्धा कुठलीच तरतूद न केल्याने राज्यभरातील शिक्षकांत शिक्षका ंत असंतोष निर्माण झाला आहे यातूनच मागील आठवड्यात बीड येथील विनाअनुदानित शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास लावून घेत या प्रश्नाकडे राज्याचे व सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर चार बांधवांचा सरकारने अर्थसंकल्पात कुठल्याच निधीची तरतूद न केल्याने नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे
तसेच दिनांक पाच मार्च 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन सुद्धा 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी याकरता सुरू असून या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून जालना जिल्ह्यातील 500 शिक्षकांनी सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे या निर्णयावर दिनांक 24 मार्च 2025 पर्यंत शासनाने काहीतरी निर्णय करावा नसता दिनांक 25 मार्च 2025 चे सामूहिक आत्मदहन आंदोलन अटळ असल्याचे या शिक्षकांनी म्हटलेले आहे
या निवेदनावर शिक्षक समन्वय संघाचे ज्ञानेश चव्हाण सदानंद लोखंडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती नागेश नागलवाड यांच्यासह अन्य 500 शिक्षकांच्या सह्या आहेत

आज रोजी शिक्षकांचा मोर्चा निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला व यात चार शिक्षकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला व त्याचवेळी पोलिसांनी सतर्क राहून त्यांना अटक करण्यात आले अटक करणाऱ्यांची नावे ज्ञानेश चव्हाण शंकर शेरे मंदाकिनी खलसे व गजानन खैरे छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 29.24 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 31746 क्युसेक्स तर वारणा धरणातून 14880 क्युसेक्स विसर्ग सुरू..

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा