vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मलकापूर येथील स्टेट बॅंकेच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत परकीय चलन सुविधा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.. व्यापारी, उद्योजक व निर्यातदारांना दिलासा

मलकापूर येथील स्टेट बॅंकेच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत परकीय चलन सुविधा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.. व्यापारी, उद्योजक व निर्यातदारांना दिलासा

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार करण्यासाठी मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत नव्याने परकीय चलन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. अमरावती विभागातील सर्वाधिक निर्यात बुलढाणा जिल्ह्यातून होत असल्यामुळे ही शाखा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या शाखेच्या माध्यमातून निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार थेट मलकापूरमध्येच करता येणार आहेत.

आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील निर्यातदारांना त्यांच्या परकीय चलन व्यवहारांसाठी अकोला येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसे आणि अतिरिक्त परिश्रम वाया जात होते. मात्र, आता मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत नव्याने सुरु झालेल्या सुविधेतून हे सर्व व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करता येणार असल्यामुळे व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शाखेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निर्यातदारांना थेट जिल्ह्यातच परकीय चलनाशी संबंधित सेवा मिळाल्यामुळे आर्थिक व्यवहार वेगाने आणि सोयीस्कर पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. परकीय चलन बिलांची परतफेड (फॅारेक्स बील रिडेम्पशन) आता स्थानिक पातळीवरच करता येणार असल्याने निर्यातदारांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.

“निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात अव्वल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल आहे. परकीय चलनाशी संबंधित व्यवहार सुलभ सुविधा मलकापूर एसबीआय च्या लघू व मध्यम उद्योग शाखेत सुरू झाल्याने जिल्ह्यातील निर्यातदारांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे त्यांचा वेळ, मेहनत आणि आर्थिक खर्च वाचणार असून, त्यांचे व्यवहार अधिक गतीमान व सोयीस्कर होतील.”असे मत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.

व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांकडून स्वागत

जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक आणि निर्यातदारांनी या सुविधेचे स्वागत केले असून, यामुळे जिल्ह्यातील व्यवसायवृद्धीला नवा वेग मिळणार आहे. मलकापूर येथे ही सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.००००

संबंधित पोस्ट

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) राहणार सज्ज आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्यासाठी विशेष दलाची रचना   

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह