vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेच्या अंमलबजावणीतून गावे पाणीदार बनविण्यासाठी जनजागृती करणारा जलरथ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून रवाना करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सकाळी हा जलरथ रवाना झाला. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. गावातील जलाशयांमधील गाळ काढुन तो शेतांमध्ये टाकला जावा, त्यातून जमिनीची उत्पादकता वाढावी व जलाशयांची साठवण क्षमता वाढावी, नाल्यांची वहन क्षमता वाढावी यासाठी ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, इंधन इ. बाबींचा खर्च शासनामार्फत करण्यात येतो. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा व आपले गाव पाणीदार बनवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यानिमित्त केले.

 याप्रसंगी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, भारतीय जैन संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष गौतम संचेती, राज्य महासचिव प्रवीण पारख, प्रकल्प प्रमुख किशोर ललवाणी, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पगारिया, पारस चोरडिया, सफल रायसोनी, अभिजीत हिरप, सतीश लोढा, अविनाश डोढल, पल्लवी डोढल, निकेतन कोठारी, सुनील लोढा, मनीष बनसोड यांची उपस्थिती होती . त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, कैलास पाटील बहुउद्देशीय संस्था, ज्योती फाउंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल नक्षलोत्तर परिवर्तनासंदर्भातील राज्यस्तरीय आढावा बैठक

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती;पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट- मंत्री आदिती तटकरे.