vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

26 तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

26 तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

 

बुलडाणा, प्रतिनिधी : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार सन 2025-26 वर्षाकरिता, बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील 26 तलाव निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्यतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील 26 तलाव पळसखेड भट 30 हेक्टर, मातला 27 हे., कव्हळ 41 हे., चांदई/गोद्री 35 हे., ब्राम्हणवाडा 96 हे., हराळखेड 42 हे., चायगांव 23 हे., पळशी बोरी 57 हे., कळपविहीर 33 हे., पिंपळगांव चिलमखाँ 28 हे., शिवणी आरमाळ 85 हे., तांदूळवाडी 35 हे., निमगांव वायाळ 10 हे., चोरपांग्रा 36 हे., धामणगांव बढे 35 हे., गणेशपूर 22 हे., हिवरखेड क्र. 120 हे., लांजुड 36 हे., पिंपरखेड 29 हे., कंडारी 40 हे., पलढग 119 हे., नेतन्सा 119 हे., बोराखेडी 144 हे., ढोरपगांव 105 हे., निम्नज्ञानगंगा-II 171 हे., दुर्गबोरी 14 हेक्टर या तलावांची मुदत दि. 30 जून 2025 रोजी संपुष्टात येत आहे. सन 2025-26 वर्षाचे तलाव ठेका प्रक्रियाकरिता नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्यतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे.

शासन निर्णय कृषी व पदुम विभाग दि. 3 जुलै 2019 मधील तरतूदी व अटी शर्तीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव ठेका मुदत संपुष्टात आलेले तलाव नव्याने मासेमारी ठेक्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन- पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू

*‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्साहात सुरुवात; नागरिकांनी घेतला महसूल सेवांचा लाभ*

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्‍यपदी आमदार सुधाकर अडबाले यांची नियुक्‍तीसभापतींनी केली तीन समित्‍यांवर नियुक्‍ती..