vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

रायगड( प्रतिनिधी:- विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण कार्यालयात वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी लेखापालाची कामकाजासाठी आवश्यकता असून इच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी ही बातमी प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसाचे आत त्यांचे अर्ज विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण, स्वप्नपूर्ती बंगला, होरायझन हॉलच्या मागे, मु.लक्ष्मीनगर, पो.वरसोली, ता. अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात लेखी स्वरुपात समक्ष येवून सादर करावेत, असे आवाहन विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण कांचन पवार यांनी केले आहे.
महसूव व वन विभागाच्या दि.02 ऑगस्ट 2024 शासन निर्णयान्वये कांदळवन कक्ष मुंबई पुर्नरचना होवून (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) कांदळवन विभाग दक्षिण कोकण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांचे कार्यालयाचे मुख्यालय अलिबाग रायगड येथे आदेशित केले असून अलिबाग येथे स्थित आहे. विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण विभागांतर्गत वनपरिक्षेत्र रायगड, रत्नागिरी, मालवण (सिंधुदुर्ग) कांदळवन हे समाविष्ट आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
००००००

संबंधित पोस्ट

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना,सुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती…

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…