vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा राज्यस्तरावर गौरव

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा राज्यस्तरावर गौरव

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  *मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोत्कृष्ट महानगरपालिका आयुक्त गटात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी तृतीय क्रमांकाच्या मानांकनाचे प्रशस्तिपत्र स्विकारले.*

   राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी “१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम” राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन व कागदविरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या सर्वच बाबींमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली.

  या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक गतिमान, प्रभावी आणि नागरिकांना उत्तरदायी बनविणे या उद्दिष्टपूर्तीसाठी विशिष्ट निकषांवर आधारित क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सेवा वितरणाची वेळ, जनसंपर्क व प्रतिसाद, नविन उपक्रमांची अंमलबजावणी, डिजिटलायझेशनचे प्रमाण, नागरिकांच्या समाधान अशा बाबींचा समावेश करण्यात आला होता. त्यास अनुसरून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल राज्यातील महानगरपालिकांमध्ये तृतीय क्रमांकाने घेण्यात आलेली आहे.

 *नवी मुंबईचा हा राज्य स्तरावर झालेला गौरव आपले मानांकन अधिक उंचाविण्यासाठी प्रेरणा देणारा असून पारदर्शक, जबाबदार व कार्यक्षम प्रशासन राबविणाऱ्या कार्यपद्धतीचा गौरव आहे. लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवत नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे सुलभ रितीने व्हावीत याकरिता 68 लोकसेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून त्या नागरिकांच्या सर्वाधिक वापर असणाऱ्या मोबाईल व व्हाॅट्सअप सारख्या माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात लोकसेवांशिवाय महानगरपालिकेची निगडित आणखी सेवा उपलब्धतेची कार्यवाही जलद करण्यात येत असून नागरिकांना अधिक तत्पर, गतीमान आणि समाधानकारक सेवा पुरविण्यासाठी उत्तम काम केले जाईल असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या गौरवाबद्दल समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले

संबंधित पोस्ट

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’**शिवकालीन दुर्लभ शस्त्र प्रदर्शन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम का सजीव दर्शन!*

माणूस मारून विचार संपत नाही!’ दाभोलकरांच्या स्मरणार्थ घाटकोपरमध्ये निर्भय मॉर्निंग वॉक-संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

अग्निशमन सेवा दिनानिमित्त नमुंमपा अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या –

vishwatmaklokswamivarta