vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली…

राज्य प्रतिनिधी-मुंबई,  : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण, मुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालय १० मे रोजी पार पडले. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आले होते. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम, मुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवी, पक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करुन झाली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारी, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित पोस्ट

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

मालेगावात महापौर निवडणुकीनंतर मोठी दुर्घटना, मनपा सभागृहातील लिफ्ट अडकली

vishwatmaklokswamivarta

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…