vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर

         बुलडाणा, प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी अजित दिवटे यांनी दिली.

सोयंदेव गावातील 2 हजार 999 पशुधन व लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 57 हजार 180 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- महाज्योतीला 1500 कोटींचा निधी ; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 63 वसतिगृहे

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई 

मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे