vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कागलच्या मुजुमदार पार्कमध्ये ज्येष्ठांचा शेजार संवाद परिचय संपन्न

 कागलच्या मुजुमदार पार्कमध्ये ज्येष्ठांचा शेजार संवाद परिचय संपन्न

[ राज्य प्रतिनिधी-]

सेवानिवृत्तीनंतर किंवा गावाकडच्या आठवणी व पुढील आयुष्य सुखकर होण्यासाठी बरीच जेष्ठ मंडळी कुटुंबासह कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या पसारेवाडी मुजुमदार पार्क या ठिकाणी गेली दोन वर्षे पहिले वास्तव्यास आहे परंतु शेजार शेजार असून संवाद होत नाही त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश गिरी व श्री दिलीप सावित्री महादेव गाडेकर यांनी परिसरातील ज्येष्ठांचा आजूबाजूच्या कुटुंबांशी संवाद व्हावा याकरिता सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी रात्री साडेसात ते नऊ या वेळात मुजुमदार पार्क येथील डॉ व लेखिका श्रीमती भाग्यश्री उर्फ रमा गिरी यांच्या निवासस्थानी संवाद परिचय छोटेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत सुरुवातीला श्री प्रकाश गिरी यांनी सर्वांचा परिचय करून दिला त्यानंतर जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप सावित्री महादेव गाडेकर यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वरूप व नियोजन याबद्दल माहिती करून दिली कार्यक्रमाच्या प्रमुख राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या डॉक्टर व लेखिका श्रीमती भाग्यश्री उर्फ रमा गिरी ह्या होत्या त्यांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा तसेच त्यांनी ज्या परिस्थितीतून पुढे वाटचाल करून आयुष्य मार्गे लावले याबद्दलचा अनुभव सह माहिती दिली

 यावेळी वीस पंचवीस कुटुंबातील ज्येष्ठ व त्यांचे नातेवाईक प्रतिनिधी स्वरूपात उपस्थित होते यावेळी डॉक्टर लेखिका श्रीमती गिरी यांचे सर्वांनी स्वागत करून कौतुक केले यावेळी परिसरातील गणेश भोरे प्रवीण जाधव दिलीप सनगर शामराव कदम स्वप्निल गोसावी साहेब प्रकाश गिरी हेमंत बनने वंदना गाडेकर रंजना गिरी ही मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार व समारोप संभाषण श्रीमती पूजा अक्षय शहा यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावित्री महादेव गाडेकर यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित यांचा अल्पपहार व चहापाणी झाली सर्वांनी एकमेकाला गुड नाईट म्हणत यापुढे एकमेकांना भेटत जाऊ असे म्हणून कार्यक्रम संपवला

असल्याची माहिती विनम्र श्री गाडेकर बंधू व प्रकाश गिरी मुजुमदार पार्क कागल यांनी दिली

संबंधित पोस्ट

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा • जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान 

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता