vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

राज्य प्रतिनिधी-चंद्रपूर, : आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने विभागासाठी 21,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या अनुषंगाने, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीमध्ये स्पष्टपणे वाढ करण्यात आली असून, त्यामुळे आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजनेस निधीअभावी खंडित करावे लागणार नाही, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. केंद्र सरकारकडूनही आदिवासी विभागास 100 टक्के पाठिशी असून केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनासाठी देखील अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे.

“त्यामुळे निधी कमी केल्याचा किंवा योजना बंद केल्याचा कुठलाही अपप्रचार चुकीचा असून, तो तत्काळ थांबवावा,” असे आवाहन डॉ. वुईके यांनी यावेळी केले.

०००

संबंधित पोस्ट

मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळेल*मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणी…

vishwatmaklokswamivarta

परिसराबरोबरच वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एनएसएस युनिटच्यावतीने “स्वच्छता ही सेवा” अभियान

vishwatmaklokswamivarta

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन