vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी

        सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत इको तपासणी शिबिराचा 185 लाभार्थींना लाभ झाला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या सर्वस्वी प्रयत्नातून या इको तपासणी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले.  या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, आयएमए अध्यक्ष डॉ. रवींद्र मोहिते, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, डॉ. छाया पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, महेंद्र खोत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी लाभार्थी रुग्ण व पालकांना यावेळी मार्गदर्शन केले. या शिबिरातून शस्त्रक्रियाकरिता संदर्भित होणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया पात्र बालकांच्या व पूर्णपणे मोफत हृदय शस्त्रक्रिया या शासनामार्फत विविध योजना, खाजगी रक्कमदाते, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय संस्था इत्यादिमार्फत आवश्यक निधी उभा करून सर्व शस्त्रक्रिया या मोफत तसेच रुग्ण व पालकांची मोफत प्रवास व निवासाची सोय करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लाभार्थी बालकांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः मिठाई वाटप केले व बालक पालकांना पुढील शस्त्रक्रिया व निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.    राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व पथकातील सदस्य तळ, गाव, वाडी, वस्ती, नगर, शहर इत्यादिपर्यंत पोहोचून बालकांना आरोग्य तपासणी सेवा देत असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवून गरजूंना तात्काळ पूर्ण मोफत सेवा उपलब्ध करून देत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे विशेष अभिनंदन केले.

  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी कार्यक्रम व शिबिर आयोजनाचे कौतुक करून मोफत हृदय शस्त्रक्रियांकरिता संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.             सन 2013 – 14 पासून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाने तळागाळातील लाभार्थींना आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असल्याबद्दल माजी आमदार दिनकर पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले

 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडी तपासणी करुन संदर्भित करण्यात आलेल्या संशयित हृदय रूग्ण बालकांकरिता या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण १८५ गरजू लाभार्थींची मोफत इको तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीकरिता हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण व त्यांचे पथक उपस्थित होते.

      सन २०२४-२५ या वर्षामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांत सांगली जिल्ह्याने शस्त्रक्रियांमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून राज्यस्तरावर देखील कार्यक्रमाचे कौतुक होत आहे. आजअखेर जिल्ह्यातील 2000 हून अधिक बालकांवर हृदय शस्त्रक्रिया व 28 हजारहून अधिक बालकांवर इतर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श…अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन.

स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू

आंतरराष्ट्रीय युवा दिन, सदभावना दिनानिमित्त बाईक रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना