vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

📍लातूर प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी #उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सअप चॅटबॉटचे उपक्रमालाही यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. उमेद अंतर्गत तुळजाई उद्योग समुहास २ कोटी ५ लक्ष रूपयाचा धनादेश, तसेच रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची चावी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत जळकोट तालुक्यातील गुत्ती येथे उभारण्यात आलेल्या पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पामुळे ७७२ शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव