vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

गडचिरोली : प्रतिनिधी राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै व ऑगस्टचे वेतन अजूनही झालेले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासनाने माहे ऑगस्टचे वेतन गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आदेश काढलेले असतांना अपुऱ्या तरतुदीमुळे संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे जुलै व ऑगस्टच्या वेतनासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मागणी केली आहे.

इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आश्रमशाळांचे वेतन हे नेहमीच एक ते दोन महिने उशिराने होत असते. दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची गृह कर्जे, वाहनकर्जे, एलआयसीचे हप्ते व बँकांच्या इतर कर्जांचे हप्ते यावर बँकांना अतिरिक्त व्याजाचा भरणा करावा लागतो. सणासुदीचे दिवस असूनही असेच पगार उशिरा होत राहिले तर बँका कर्मचाऱ्यांच्या एकाच महिन्याचे पगारातून दोन दोन कर्जाचे हप्ते कपात करतात परिणामी कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचारी सतत आर्थिक विवंचनेत असतो.

सणासुदीचे दिवस असल्यामुळे जुलै व आगष्टचे वेतन अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभाग यांना पत्र देऊन केलेली असून सर्व कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना ड्रायपोर्टच्या उभारणीस गती देण्यासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई,पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळाव लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा…

vishwatmaklokswamivarta

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन