vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज पासूनमुंबई-कोकण जोडणारी Ro-Ro फेरी सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू

 आज पासून मुंबई-कोकण जोडणारी Ro-Ro फेरी सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू

 

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने दक्षिण आशियातील सर्वात वेगवान Ro-Ro (Roll-On Roll-Off) फेरी सेवेला हिरवा कंदील दिला आहे. ही सेवा मुंबईला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्गशी जोडणार असून १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

Ro-Ro फेरीद्वारे प्रवासी आपले वाहन थेट बोटीत चढवून प्रवास करू शकतात आणि गंतव्यस्थानी उतरवू शकतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक, इंधन खर्च आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

🎉 गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा,परंपरागत मुंबई-गोवा महामार्गावरील प्रचंड ट्रॅफिक आणि गजबजलेल्या रेल्वे मार्गांचा त्रास टाळण्यासाठी ही फेरी उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा सोयीची ठरेल

📍 प्रवास वेळ

मुंबई ते रत्नागिरी (जायगड) – फक्त ३ ते ४ तास मुंबई ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) – ५ ते ६ तास🚢 क्षमता व सुविधा ५० कार, ३० दुचाकी, मिनीबस व मोठे बस वाहतूक करण्याची सोय

एकूण प्रवासी क्षमता – ६५६ जागा

💰 प्रवास भाडे,इकॉनॉमी क्लास (552 सीट): ₹2,500,प्रीमियम इकॉनॉमी (44 सीट): ₹4,000 बिझनेस क्लास (48 सीट): ₹7,500फर्स्ट क्लास (12 सीट): ₹9,000कार: ₹6,000 | दुचाकी: ₹1,000 | सायकल: ₹600

मिनीबस: ₹13,000 | 30-सीटर बस: ₹14,500 45-सीटर बस: ₹17,000 | मोठी बस: ₹21,000👉 नितेश राणे यांनी या प्रकल्पाला “कोकणाच्या इतिहासातील सुवर्णक्षण” असे संबोधले आहे.

संबंधित पोस्ट

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदनमहानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे-जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta