vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल प्रतिनिधी-सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये दिनांक 01 सप्टेंबर रोजी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गादर्शनाखाली ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले.

आजच्या बैठकित नागरी सेवा सुविधा विभागाचे दोन अर्ज दाखल झाले होते, या अर्जाची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या.

या कार्यक्रमास परिवहन विभाग व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादवाढीसाठी महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवस आधी द्यावेत. संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनादिवशी उपस्थित रहावे.

#PanvelMunicipalCorporation #panvel #लोकशाहीदिन

संबंधित पोस्ट

महापालिका, नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रात‘कर मुल्यांकनासाठी’ विशेष मोहीम राबविणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल …

vishwatmaklokswamivarta

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-निवडणूक नोंदणी अधिकारी  आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कृषीआधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर. आणि अमरावती विभागातील बातम्या…

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटकानाल्सा (National Legal Services Authority) योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केली धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta