vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन

राज्य प्रतिनिधी –

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू‌. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली असून ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून जड मशिनरी वाहतुकीसाठी वाहतूक बंदीचा आदेश जारी 

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षा व न्यायासाठी महिला काँग्रेसचा जालना शहरात मूक मोर्चा गांधी चमनवर निषेधाची शांत आंदोलनात्मक भूमिका..

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं.  यात्रेच्या पहिल्या सहा दिवसांत ९३ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आहे.

vishwatmaklokswamivarta

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?