vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

रायगड-अलिबाग,⁵):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, रायगड-अलिबाग येथील राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे, यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा व माहिला बाल विकास अधिकारी, निर्मला कुचिक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी आणि प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे म्हणाल्या की, पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कबड्डी खो-खो टेबल टेनिस हॅण्ड बॉल या स्पर्धांचे आयोजन करायचे आहे, यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या स्पर्धेसाठी बॉक्सिंग किट उपलब्ध करून दिली असून या स्पर्धेमध्ये मुंबई आणि कोकण विभागातून चार खेळाडू सहभागी होत आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ही संख्या अधिकाधिक वाढवायची आहे. यासाठी क्रीडा विभागाने अधिकाधिक काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातून आठ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माणगाव येथे अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुलासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाची इमारत ही खेळाडू व क्रिडा विभागासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण इमारत आहे. क्रीडा विभागाकडून साधारणपणे 15 कोटींचा प्रस्ताव मंत्रालय, स्तरावर पाठविण्यात आला आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली क्रिडा संकुलाची इमारत ही सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी चांगल्या पध्दतीची सुविधा निर्माण करुन दिल्या जातील. येथे येणाऱ्या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था निर्माण करुन दिली जाणार आहे. क्रीडा संकुलात आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलबध करुन देण्याकरिता जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, कंपन्याच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली⁵ç.

 

000000

संबंधित पोस्ट

२५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

चैत्राच्या सोनेरी पहाटेत, आनंदाची गुढी उभारूया, नववर्षाचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – मंत्री आदिती तटकरे