vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…

     नवी मुंबई प्रतिनिधी-   मागील वर्षी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि मराठी भाषेचा गौरव अधिकच वृध्दींगत झाला. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यभरात दि. 3 ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

  या अनुषंगाने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविणारे व मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख करून देणारे विविध उपक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत.

 यामध्ये शुक्रवार दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य अकादमी, नवी दिल्लीचे शासकीय सदस्य तथा सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते डॉ. प्रा. नरेंद्र पाठक यांचे ‘अभिजात मराठी – अभिमान मराठी’ या विषयावर सकाळी 11.00 वाजता महापालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावरील ज्ञानकेंद्रात व्याख्यान संपन्न होणार आहे.

 त्याचप्रमाणे भाषेतील शुध्दलेखनाचे महत्व लक्षात घेऊन ‘अभिजात मराठीचे शुध्दलेखन’ या विषयावर लेखक, गज़लकार श्री. जनार्दन म्हात्रे हे दि. 07 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी सकाळी 11.00 वाजता सादरीकरणाव्दारे सुसंवाद साधणार आहेत.

   अभिजात मराठी भाषेची व साहित्याची आवड अनेकजण आत्मियतेने जपतात. हे लक्षात जाणून मराठी भाषा आणि साहित्य विषयक ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम दि. 8 ऑक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे साहित्यप्रेमी नागरिकही सहभागी होऊ शकतात. या उपक्रमांतर्गत उपस्थितांना मराठी भाषा व साहित्य विषयक प्रश्न विचारले जाणार असून कार्यक्रमस्थळी उपस्थित असणा-या श्रोत्यांमधून योग्य उत्तरे देणा-या श्रोत्यास त्याचवेळी पुस्तक स्वरुपात पारितोषिक प्रदान केले जाणार आहे

      अशाच प्रकारचा आणखी एक ‘काव्यवाचन स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम दि. 09 ऑक्टोबर (गुरुवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये स्वत:च्या नव्हे तर अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आपल्याला आवडलेल्या एका कवितेचे कमाल पाच मिनीटात सादरीकरण करावयाचे आहे. या परकाव्यवाचन स्पर्धेच्या माध्यमातून अभिजात मराठी कवितेची समृद्ध परंपरा मांडली जाईल व याव्दारे मराठी भाषेचे वैभव आणि वैविध्यपूर्ण शब्दलालित्य प्रसारित होईल अशी संकल्पना आहे.

  या स्पर्धांमधील सहभागाकरिता दि. 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत 9920378574 किंवा 9930020814 या संपर्कध्वनी क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. ऐनवेळी स्पर्धा प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये व्यापक लोकसहभाग असावा या महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेनुसार अभिजात मराठी भाषेचा गौरव करणा-या या अभिनव उपक्रमांमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्याप्रमाणेच मराठी भाषाप्रेमी नागरिकांनीही सहभागी व्हावे तसेच या अंतर्गत आयोजित विनामूल्य प्रवेश असलेल्या ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ व ‘काव्यवाचन स्पर्धा’ यामध्येही उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

000

 

संबंधित पोस्ट

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह पश्चिम विभागीय परिषदेची २८ वी बैठक

vishwatmaklokswamivarta

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास जालना जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta