vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

*सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

सातारा प्रतिनिधी सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार असून पिडीत कुटुंबला सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी सासपडे येथे जावून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नितीन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल उपस्थित होते.

कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणाची केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. पोलीस विभागाने सखोल तपास केला असून आरोपी कुठल्यही परिस्थितीत सुटणार नाही. केस फास्ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी नामांकित वकील देण्यात येईल. सासपडे येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्यावतीने पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येकी 5 लक्ष रुपयाची मदत दोन पिडीत कुटुंबांना दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार-वनमंत्री गणेश नाईक

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११३ गावांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

शास्त्री चौक-काळीवाट रस्ता 27 सप्टेंबरपासून दोन महिने वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta