vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

राज्य प्रतिनिधी-पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वासुदेव बळवंत फडके इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ‘अमृत दुर्गोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती परंपरेला अभिवादन म्हणून शाळेत दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात विद्यार्थ्यांना १२ गटांमध्ये विभागून विविध ऐतिहासिक दुर्गांची प्रतिकृती साकारण्यास प्रवृत्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांचे हुबेहूब वास्तू साकारून शिवकालीन वास्तुकलेचा आणि इतिहासाचा भव्यतेने आविष्कार केला.

या स्पर्धेचे परीक्षण नामवंत इतिहास अभ्यासक आणि मोडी लिपी संशोधक पंकज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. श्री भोसले ‘हेमाद्री’ मासिकाच्या माध्यमातून मोडी लिपीचे संवर्धन करत असून, ऐतिहासिक खेळांच्या कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची रुची निर्माण करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेतस्पर्धेनंतर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत सांगितले की, “ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा न राहता इतिहासाशी जोडणारा सेतू ठरली आहे.स्पर्धेतील विजेत्यांना श्री. भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या प्रसंगी रायगड ‘अमृत’चे प्रतिनिधी शैलेश मराठे यांनी लवकरच ‘शिवचरित्र स्पर्धा २०२६’ घेण्यात येणार असून त्याच्या तयारीसाठी प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू झाल्या आहेत, असे जाहीर केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या चरित्राचा सखोल अभ्यास करता येईल, असेही ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ८,१८,२८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक– महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड