vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

नवी मुंबई, प्रतिनिधी “जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज कोकण भवनमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचा’ प्रारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता कोकण भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.

  दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या 2025 या वर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2025 या कालावधीत या ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला संदेशाचे वाचन केले. कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000 000

संबंधित पोस्ट

वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर