vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

जालना, प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्वाचेअसल्याचे प्रतिपादन शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी केले.जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथे दलित आदिवासी मेळावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुखअ‍ॅड. भास्कर मगरे बोलताना म्हणाले, दलित आदिवासी जाती-जमातीचे मूलभूतप्रश्नावर शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे. दलित आदिवासी सोबतच गावगाड्यातील अनेकसमस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न जालना जिल्हा शिवसंपर्क सामाजिक अभियानातून सोडविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. दलित आदिवासी,भूमिहीन कास्तपट्टे प्रलंबित प्रश्न, गावगाड्यातील घरकुले प्रश्नजागेविना अनेक लाभार्थी वंचित आहेत.सर्वांसाठी घरे-२०२२-२४ अधिनियमानुसार मागेल त्याला घर आणि राहील तिथे घरलाभार्थी गावठाणमध्ये राहत असेल तर गावठाण ८ अ उत्तरेला नोंद घेऊन समोरठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावे तसेच गायरानात रहात असेल तर२०११ पूर्वीचा पुरावासमोर ठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावेअसे सर्वांसाठी घरे ग्रामीण २०२२-२४ मध्ये नमूद असताना प्रशासकीय यंत्रणाया अधिनियमाचे अंमलबजावणी करत नाहीत अंमलबजावणी केल्यास उपेक्षितसमाजातील एक ही लाभार्थीघरकुलापासून वंचित राहणार नाही.पुढे मगरे म्हणाले की, त्याचप्रमाणे निराधाराचा निराधाराच्या मासिक देअनुदानात दीड हजार ऐवजी तीन हजार रुपये केल्यास निराधार चांगल्याbपद्धतीने जगू शकतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तरुणांमध्ये बेकारीचेप्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तेव्हा शासकीय आर्थिक विकास

महामंडळाकडून उदाहरणार्थ महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीरअण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ या व इतर महामंडळाकडून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज वितरण ग्रामीण,भागातील तरुण बेरोजगारीला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने शिवसंपर्क सामाजिक अभियानामार्फत व लोकआंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे आणि म्हणूनजनतेचे जीवनमान सुधारणारे प्रश्नाचे सोडवणूक झाली पाहिजे म्हणून यासाठीराजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, असेही अ‍ॅड. मगरे म्हणाले.याप्रसंगी जय खरात,अण्णासाहेब बाळराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर;हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या ..

घणसोली बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिनानिमित्त सामाजिक कृतज्ञता कार्यक्रम संपन्न 

vishwatmaklokswamivarta

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

vishwatmaklokswamivarta

देशातील  मोठे व्यवसायिक अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप…