vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

सांगली, प्रतिनिधी – येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या कृष्णा नदीवर बांधून तयार असलेला आयर्विन पुलाला समांतर असणारा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला.

जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पूल खुला करण्यात आला.

सांगली शहरातील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने जनतेच्या सुविधेसाठी हा पूल तात्काळ सुरू करणे आवश्यक होते. सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हा पूल वाहनांच्या वापरासाठी सुरक्षित आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे सदर पूल तांत्रिकदृष्ट्या वापरण्यास योग्य असल्याने सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे.

00000

संबंधित पोस्ट

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन  मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा…

vishwatmaklokswamivarta

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन